लक्षात नसलेला बाप

वडिल, बाबा, पप्पा, डॅडी, पिता लिहिण्याला बोलण्याला खुप चांगलं वाटत पण पण आपण प्रत्येक जण सहजपणे नेहमी जाणुन बुजुन शब्द उच्चारतो तो म्हणजे बाप होय होय बाप त्याच बापा विषयी थोडे काही आई घराच मांगल्य असते तर बाप घराच अस्तित्व असतो, पण घराच्या या अस्तित्वाला खरच आम्ही कधी समजुन घेतलेले आहे का वडिलाना महत्व असुनही त्यांच्या विषयी जास्त बोलले जात नाही, लिहिले जात नाही कोनताही व्यक्ता त्याच्या विषयी जास्त बोलत नाही, लिहित नाही, पण कोणताही व्यक्ता आई विषयी जास्त वेळ बोलत रहातो, संत-महात्म्यांनी आईचेच महत्व अधिक संगितलेले आहे, देवा-दिकांनी आईचेच तोंड भरुन कौतुक केलेय, चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते, पण बापाच्या विषयी कुठेच फारसं बोललं जात नही, काही लोकांनी बाप रेखाटला पण तो ही तापट, व्यसनी, मारझोड करणारा, समाजात 1, 2 % बाप असे असतील ही पण चांगल्या पित्यांबद्दल काय चांगल्या वडिलांबद्दल काय आइकडे अश्रुंचे पाट असतात पण बापाकडे संय्यमाचे घाट असतात, आई रडुन मोकळी होते पण सांत्वन वडिलांच करावे लागते आणि रडनार्या पेक्षा सांत्वन करनार्या वरच जास्त ताण पडतो, कारण ज्योती पेक्षा समयीच जास्त तापते ना पण पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत रोजच्या जेवनाची सोय करणारी आई आमच्या लक्षात रहाते पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरुन जातो आई रडते पण वडिलांना रडता येत नाही स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नही कारण छोट्या भावंडांना जपायच असतं, आई गेली तरी रडता येत नाही कारण बहिणींना आधार व्हायच असतं, पत्नी अर्ध्यावरच सोडुन गेली तरी पोरांसाठी अश्रुंना आवर घालावा लागतो, जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हनावं पण त्य वेळी शहाजीराजांची ओढाताण सुध्दा लक्षात घेतली पहिजे, देवकीचे, यशोदेचे कौतुक अवश्य करावं पण पुरातुन डोक्यावरुन पोराला घेऊन जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा, राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण वियोगात मरण पावलेला दशरथ होता, वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहिले की त्यांच प्रेम कळतं त्यांची फटकी बनियान पाहिली की कळत आमच्या नशिबाची भोक त्यांच्या बनियानला पडलीयेत, त्यांचा दाढी वाढलेला चेहरा, त्यांची काटकसर दाखवतो, मुलीला गाऊन घेतील, मुलाला लुंगी घेतील पण स्वतः मात्र जुनी पॅंट वापरायला काढतील, मुलगा सलुन मध्ये 20, 25 रुपये खर्च करतो मुलगी ब्युटीपार्लर मध्ये 30, 35 रुपये खर्च करते पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणुन आंघोळीच्या साबणाने दाढी खरवडत असतो अनेकदा तो नुसता पाणी लाऊण दाढी करतो, बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही, तो आजाराला मुळीच घाबरत नाही पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भिती वाटते, कारण मुलीच लग्न, पोराच शिक्षण बाकी असतं, घरात उत्पन्नाच दुसर साधन नसतं, ऐपत नसते तरी मुलाला मेडिकलला इंजिनियरिंगला प्रवेश मिळवुन दिला जातो, ओढाताण सहन करुन त्या मुलाला दर महिन्याला पैशे पाठवले जातात पण सर्वच नसली तरी काही मुलं अशी ही असतात कि ते तारखेला पैशे येताच मित्रांना परमिट रुम मध्ये पार्टी देतात, आणि ज्या बापानी पैशे पाठवलेत त्याच बापाच्या नावाने एकमेकांना हाका मारतात, वडिलांची टिंगल करतात, आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो, ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेने कोणीही बघु शकत नाही कारण घरातला कर्ता जिवंत असतो तो जरी काही करीत नसला तरी तो त्या पदावर असतो आणि घरच्यांच कर्म बघत असतो, कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही पण बाप होणं टाळता येत पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही, आईच्या असण्याला किंवा आई होण्याला बापाहुन व्यर्थ असतो, कोणत्याही परिक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते, पण गुपचुप जाऊन पेड्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात येत नाही. पहिलित्कर्नीच खुप कौतुक होतं पण हॉस्पिटलच्या आवरात अस्वस्तपणे वावरनार्या त्या बापाची कोणीही दखल घेत नाही, चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई गं हा शब्द बाहेर पडतो पण हायवे ला रस्ता ओलांडताना एखादा ट्रक जवळ येवुन अचानक ब्रेक लावतो तेव्हा बाप रे हाच शब्द बाहेर पडतो, कारण छोट्या छोट्या संकटांसाठी आई चालते पण मोठी मोठी वादळं पेलताना बाप च आठवतो, काय पटतेय न? कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात पन मयताच्या वेळी बापालाच जाव लागतं, कोणताही बाप श्रीमंत मुलिच्या घरी जास्त जात नसतो पण गरिब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो, तरुण मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही त्याचा बाप च जागा असतो, मुलाच्या नोकरी साठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळा साठी उंबर्ठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप, खरचं किती ग्रेट असतो ना? वडिलांच महत्व कोणाला कळत लहाणपनीच वडिल गेल्यावर अनेक जबाबदार्या खुप लवकर पेलाव्या लागतात, त्याला एक एका वस्तुंसाठी तरसावं लागतं, वडिलांना खर्या अर्थाने समजुन घेते ती त्या घरातली मुलगी सासरी गेलेल्या अथवा घरापासुन दुर असलेल्या मुलीला बापाशी फोन वर बोलताना बदललेला आवाज एक क्षणात कळतो, मग ती अनेक प्रश्न विचारते कोणतीही मुलगी स्वतःच्या ईच्छा बाजुला ठेवुन बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढते मुलगी वडिलांना जानते, जपते इतरांनी सुध्दा असचं आपल्याला जानावं हिच बापची किमान अपेक्षा असते.

लक्षात नसलेला बाप mp3 फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा LAKSHAT NASALELA BAAP


Insane